किनगावजवळ अवैध वाळू वाहतुकीचा मिनी ट्रक पकडला


A mini truck carrying illegal sand was caught near Kingaon यावल : यावल तालुक्यातील किनगावजवळ रात्रीच्या वेळी अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करताना टाटा कंपनीच्या वाहनाला फैज्पूरच्या सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व त्यांच्या पथकाने पकडल्याने अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली. वाहन चालक व सोबत असलेल्या तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास कारवाई
शनिवार, 9 मार्च रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह व पथक रात्री किनगाव ते डांभुर्णी रस्त्यावर गस्त घालीत असताना जळगावकडून किनगावकडे येणार्‍या (एम.एच. 48 टी. 2576) या टाटा कंपनीच्या तपकिरी रंगाच्या गाडीवर ताडपत्री बांधून त्यात अवैध वाळू वाहतूक करताना चालक सुधाकर मधुकर सपकाळे, सोपान नामदेव सोनवणे (खेडी, आव्हाना, ता.जळगाव) हे विनोद शितोळे (एस.टी.कॉलनी, जळगाव) यांच्या सांगण्यावरून अवैध गौणखनिजाची वाहतूक करताना आढळल्याने पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !