यावल-चोपडा रस्त्यावर गिरडगावजवळ एसटी बसला ट्रकची धडक : चालक जखमी


Truck collides with ST bus near Girdgaon on Yaval-Chopda road : Driver injured यावल : यावल-चोपडा रस्त्यावर गिरडगाव गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने एस.टी.बसला समोरून धडक दिल्याने अपघातामध्ये बस चालक हा जखमी झाला. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. जखमी चालकास नागरीकांच्या मदतीन यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.

अपघातात बस चालक जखमी
चोपडा-यावल रस्त्यावरील गिरडगावनजीक यावल-चोपडा (बस क्रमांक एम. एच.20 बी. एल.0933) घेऊन चालक शेख नूर मोहंमद अब्दुल हक (35, रा.साकळी) हे यावलकडून चोपड्याकडे जात असताना चोपड्याकडून यावलकडे भरधाव वेगाने ट्रक (क्रमांक जी.जे.03 तीन ए. डब्ल्यू. 4779) घेऊन अज्ञात चालक येत होता. त्याने भरधाव वेगात गिरडगाव गावाजवळ उतारावर एस.टी.बसला समोरून धडक दिल्याने बस चालक शेख नूर मोहम्मद यांच्या पायाला दुखापत झाली व बसचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर गिरडगाव येथील योगेश पाटील, दिनकर पाटील, भागवत पाटील, सुरेश पाटील, विशाल पाटील यांनी धाव घेतली. जखमी चालकाला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, अधिपरीचारक जॉन्सन सोरटे, कादर तडवी आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !