कुर्हेपानाचे कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा : दोघा कोंबड्याचा लिलाव ; पसार संशयितांचा कसून शोध
Kurhepana’s bet on cockfights : auction of two cocks ; A thorough search for spread suspects भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कुर्हा शिवारात शेतात मध्य प्रदेशातील बर्हाणपूर, खंडवा येथून कोंबड्यांची झुंज लावून त्यावर सट्टा खेळणार्या 11 संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. संशयितांना लेखी समज देऊन पोलिसांनी शुक्रवारी रात्री घरी सोडले तर पसार तिघांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेले दोन्ही कोंबड्यांची दोन हजार रुपयात लिलावाद्वारे विक्री केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना शुक्रवारी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्हापानाचे शिवारातील एका शेतात मध्यप्रदेशातील काही संशयित कोंबड्यांची झुंज लावून त्यावर सट्टा लावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहायक निरीक्षक विशाल पाटील व पथकाने शेतात जात तेथे सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर छापा मारत 11 संशयितांना ताब्यात घेतले तर त्रिकूट पसार झाले. पोलिसांनी जप्त केलेल्या दोन्ही कोंबड्यांची पशू वैद्यकीय तपासणी करून दोन्ही कोंबड्यांची दोन हजारात विक्री केली. पोलिसांनी या प्रकरणी 14 मोटरसायकली जप्त केल्या आहे. पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस शेख पुढील तपास करीत आहे.8

