डोंगरकठोरा शिवारात अवैध वृक्षतोड : ट्रॅक्टरसह दोघे संशयित ताब्यात


Illegal felling of trees in Dongarkathora Shiwar : Two suspects arrested with tractor यावल : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा ते हिंगोणा रस्त्यावर शुक्रवारी अवैधरीत्या विविध जातीच्या वृक्षांची तोड करून वाहतूक करताना ट्रॅक्टर वन विभागाच्या पथकाने मिळाल्याने मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त करीत दोन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईने अवैधरीत्या वृक्षतोड करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सातपुडा वनक्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरकठोरा ते हिंगोणा रस्त्यादरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे हे गस्तीवर असताना पथकाने स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.29 एम. 4984 पकडलेे. यात अवैधरित्या निंब, करंज, सुबाभुळ जातीचे 6.300 घन मिटर जळाऊ लाकड असल्याने ट्रॅक्टर व लाकूड असा सुमारे एक लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने हस्तगत करीत दोघांना ताब्यात घेतले. हा मुद्देमाल यावल वन आगारातील विक्री केंद्रात जमा करण्यात आला. .याबाबत आगार रक्षक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डोंगरकठोरा वनपरीमंडळ अधिकारी रवींद्र तायडे व वन विभागाचे नाकेदार बी.बी.गायकवाड करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !