अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ : भुसावळ महसूल प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतुकीचे तीन डंपर जप्त


Excitement among illegal sand mafia: Bhusawal revenue administration seized three dumpers of illegal sand transport भुसावळ : अवैध वाळू वहतूक करणार्‍यांविरोधात तहसील प्रशासनाने धडक मोहिम उघडले असून दोन दिवसात तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली. महसूल यंत्रणेकडून दोन डंपर मालकांना प्रत्येकी दोन लाख 45 हजार 770 रूपयांचा दंडाची नोटिस बजाविण्यात आल्याने खळब्ळ उडाली.

धडक कारवाईने उडाली खळबळ
सोमवार, 11 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास गोजोरा-कुर्‍हा रस्त्यावर वाळूने भरलेला ट्रक (एम.एच.18 एम. 5934) पथकाने अडवल्यानंतर चालकाकडे परवाना नसल्याने वाहन जप्त करण्यात आले तर मंगळवार, 12 रात्री 2 वाजेच्या सुमारास महामार्गावर जळगावकडून भुसावळकडे येत असलेली वाळूने भरलेली ट्रकमध्ये वाळू आढळल्याने हे वाहन जप्त करण्यात आले. या दोन्ही ट्रक संदीप गणेश ठाकूर (जळगाव) यांच्या असल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिले. ठाकूर यांना प्रत्येकी दोन लाख 45 हजार 770 रुपयांच्या दंडाची नोटीस बजाविण्यात आली. ही कारवाई तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी एस.एच.खान, पवन नवगाळे, दिलीप तायडे आदींनी केली. भाऊसाहेब शिरसाठ यांनी याप्रकरणी दंडाच्या नोटीसा काढल्या आहे.



गोजोरा-चोरवड रस्त्यावर कारवाई
गुरुवार, 14 मार्च 2024 रोजी संदीप बेनीलाल परदेशी (साकेगाव) हे एम.एच. 19 झेड.1644) हे गोजोरा-चोरवड रस्त्यादरम्यान जळगावच्या दिशेकडून भुसावळकडे डंपर आणत असताना पथकाने तपासणी केली असता वाहनात दोन ब्रास रेती आढळली. वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना वा पावती नसल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक केल्याने वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई मंडळाधिकारी प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, रजनी तायडे, फिरोज खान, तलाठी पवन नवगाळे, मिलिंद तायडे, मंगेश पारीसे, साधना खुळे, सुनीता वळवी, नितीन केले, वाहन चालक विलास नारखेडे, कोतवाल जयराज भालेराव व जितेश चौधरी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !