सातपुड्यात वाघझिरा वनक्षेत्रात वनात वणवा पेटवतांना एकास रंगेहात पकडले
One was caught red-handed while setting fire in the forest in Waghzira forest area in Satpura यावल : सातपुड्याच्या वनराईत एक जण वणवा पेटवत असतांना वनविभागाने त्यास अटक केली.
यावल तालुक्यातील वाघझिरा गाव परिसरातील नियतक्षेत्र वाघझिरा वनखंड मधील कक्ष क्रमांक 147 मध्ये वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना संशयित गजानन शालिग्राम लोहार हा वणवा लावतांना मिळून आला. वनविभागाने त्यास अटक केली. वाघझिरा वनपाल विपूल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्र अधिकारी सुनील ताराचंद भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, वनरक्षक ए.जी.राठोड तसेच संरक्षण मजूर,फायर वाचर यांनी केली.

