रावेर तालुक्यात अंजन वृक्षांच्या पाल्याची बेकायदा वाहतूक : पिकअप वाहन जप्त
Illegal transportation of saplings of Anjan trees in Raver taluka : Pickup vehicle seized रावेर : सातपुडा पर्वतातील पाल वनक्षेत्रातून अंजन वृक्षाचा पाला बेकायदेशीररित्या तोडून चारचाकी पिकअपमध्ये भरताना संशयित आढळल्याने पिकअपसह मुद्देमाल वनविभागाने जप्त केला. शनिवारी सकाळी पाल वन कर्मचारी नियतक्षेत्र पालमधील वनक्षेत्रात गस्त करीत असताना आरोपी अक्षय नाथू डावर (रा.मध्यप्रदेश) याला कम्पार्टमेंट क्रमांक 55 मध्ये अंजनाचा पाला तोडून पिकअपमध्ये भरताना पकडण्यात आले. पिकअप क्रमांक (एम.पी.10 जी.0570) सह अंजनाचा पाला ताब्यात घेण्यात आला व आरोपीची चौकशी करण्यात आली. पिकअप आणि अंजन पाल्यासह एकूण तीन लाख 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.जी.रायशिंग, वनपाल एम.एम.तडवी, वनरक्षक एस.बी.वाघ यांनी ही कारवाई केली.

