यावल पोलिसांनी गोवंशाची वाहतूक रोखली : वाहनासह चालक ताब्यात
Yaval police intercepted the traffic of cattle : the driver along with the vehicle was arrested यावल : दहिगावहून कोरपावली जाणार्या रस्त्यावर शनिवारी रात्री एका वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक होत असताना यावल पोलिसांनी कारवाई करीत वाहनासह त्यातील गोवंश आणि चालक यांना यावल पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी रात्री उशिरा एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहन आणि गोवंश असा सुमारे एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दहिगाव-कोरपावली रस्त्यावर शनिवारी रात्री वाहन (क्रमांक एम.एच.04 एच.एस.1987) मधून चालक हनीफ दगडू तडवी (महेलखेडी) हा कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक करीत असताना गोरक्षकांनी वाहन रोखत यावल पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार हे पथकासह दाखल झाले आणि त्यांनी गोवंश वाहन व वाहन चालक याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा याप्रकरणी हनीफ तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे.

