कोरपावलीत दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला : दुचाकी फोडून नुकसान
Two-wheeler theft attempt foiled in Korpavali : Two-wheeler broken and damaged यावल : यावल तालुक्यातील कोरपावली येथे अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरीचा प्रयत्न केला मात्र एका घराबाहेरून जिल्हा परिषद शाळेच्या आवारापर्यंत दुचाकी ओढून नेतांना चोरट्याकडून लॉक न उघडल्याने दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.
कोरपावली, ता.यावल या गावात माजी पोलीस पाटील स्व.गोपाळ पाटील यांच्या घरासमोरच सुनील पाटील यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.डी. 5366) ही लावली होती. ही दुचाकी शनिवारी सकाळी घराबाहेर नसताना शोध सुरू करण्यात आल्यानंतर दुचाकी जि.प.शाळेच्या आवारात मिळून आली. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत घराबाहेरून दुचाकी शाळेच्या आवारापर्यंत ओढून नेली व दुचाकीचे लॉक न उघडल्याने संतापात दुचाकीची तोडफोड करीत नुकसान केले. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये भीती पसरली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

