स्त्री जातीचे अर्भक उकीरड्यावर फेकले : सुनसगावच्या महिलेविरोधात गुन्हा
Feminine infant thrown on Ukeerda : Crime against woman of Sunasgaon भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे एका दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक उकीरड्यावर फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भुसावळ तालुका पोलिसांनी मृत अर्भकाला ताब्यात घेत याबाबत गुप्त तपास सुरू केल्यानंतर 40 वर्षीय विधवा महिलेने हा प्रकार केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली होती. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून सुनसगावातील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उकीरड्यावर फेकले अर्भक
सुनसगाव येथील 40 वर्षीध विधवा महिलेने अनैतिक संबंधातून जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक उकीरड्यावर टाकून दिले. गुरुवार, 14 मार्च रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकारानंतर गावात मोठी खळबळ उडाली. भुसावळ तालुका पोलिसांनी मृत अर्भकाला ताब्यात घेत तपास सुरू केल्यानंतर 40 वर्षीय संशयित महिलेचे नाव समोर आल्यानंतर महिलेची चौकशी केल्यानंतर तिने अनैतिक संबंधातून बाळ जन्मल्याची कबुली देत उकीरड्यावर बाळ फेकल्याची कबुली दिली. याप्रकरणी हवालदार दीपक जाधव यांच्या फिर्यादीवरून विधवा महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.

