फैजपूरात शिलालेख झाकले : भित्तीपत्रकांवर मारला रंग


फैजपूर : रावेर लोकसभेसाठी आचारसंहिता शनिवारपासून लागू होताच प्रशासनाकडून धडक कारवाईला सुरूवात करण्यात आली. शहरातील विविध पक्षांचे फलक, जाहिरात करण्यात आलेल्या भिंतीवर काळा रंग मारण्यात येत आहे शिवाय खासदार-आमदार निधीतून मिळालेल्या हाय मास्ट पथदिव्यांवरील लोकप्रतिनिधींचे नाव झाकले जात असून विकास कामांचे फलक व शिलालेख झाकण्याचे काम सुरू आहे.

शहरात काही दिवसापूर्वीच काही पक्षांकडून भिंती पत्रके तयार करण्यात आली होती. या भिंती पत्रकांवर न.पा.प्रशासनाकडून काळा रंग फासल्यामुळे संबंधित घर मालक व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. सोमवारी याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन या बाबत संवाद साधू, असे भाजपा कार्यकर्ते संजय सराफ म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !