टरबूज घेऊन जात असलेले वाहन किनगावनजीक उलटले : सुदैवाने प्राणहानी टळली


A vehicle carrying watermelon overturned near Kingaon : fortunately a loss of life was avoided
यावल :
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर किनगावजवळ हॉटेल जत्रासमोर टरबूज घेऊन जाणारे वाहन हे अचानक अपघातग्रस्त झाले. सुदैवाने या अपघातात ट्रकमधील मजूर व चालक हे बालंबाल बचावले. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

सुदैवाने टळली प्राणहानी
किनगाव येथून मार्गस्त होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर हॉटेल जत्रासमोर अशोक लेलँड वाहन (क्रमांक एम.एच.19 सी. वाय. 9598) घेऊन चालक गणेश गोपाल चौधरी (रा.विवरे बुद्रुक, ता.रावेर) हे चोपड्याकडून यावलकडे येत असताना त्यांच्या वाहनात सावखेडासीम, ता.यावल येथील मजूर असल्याने त्यांनी किनगावच्या हॉटेल जत्रासमोर वाहन उभे केले आणि मजुरांना तिथून इतर वाहनाद्वारे जाण्याच्या सूचना केल्या.



यावेळी वाहनातून मजूर खाली उतरत असतांना अचानक वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाले आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला जावून उलटले. सुदैवाने मजूर वर्ग व चालक सर्व बालंबाल बचावले. या प्रकरणी चालक गणेश चौधरी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !