भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह संशयित जाळ्यात


Bhusawal Market Police Action : Suspect nabbed with Gavathi pistol and live cartridge भुसावळ  : गावठी पिस्टलासह संशयित फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळत त्याच्याकडील गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई पांडुरंग टॉकीजजवळील बॅटरी दुकानावर सोमवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांना गावठी पिस्टलासह संशयित फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. सोमवारी रात्री पावणेबारा वाजता पांडुरंग टॉकीजजवळील इंडिया बॅटरी दुकानासमोर संशयित रणजीत किशोर चंडाले (37, बात्तर खोली, वाल्मीक नगर, भुसावळ) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व पाचशे रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी कॉन्स्टेबल राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेश चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !