बोदवड तालुक्यातील दुचाकी चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler thief in Bhusawal Lohmarg police in Bodwad taluka भुसावळ : बोदवड तालुक्यातील दुचाकी चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी जप्त केली आहे. कामराज मिठाराम गुरचळ (52, रा.आमदगाव, ता.बोदवड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव रेल्वे स्थानकाबाहेरून 5 फेब्रुवारी आरोपीने दुचाकी लांबवल्याचे स्पष्ट होताच त्यास अटक करण्यात आली.

संधी साधून लांबवली दुचाकी
शिरसोली येथील अजीमोद्दीन निजामोद्दीन शेख (46, रा.जामा मस्जीदचे मागे शिरसोली, ता.ळगाव) यांनी परीचीत कैलास मनोहर सपकाळे (रा.धामणगाव) यांना त्यांची दुचाकी पाच महिन्यांपूर्वी वापरण्यास दिली होती. सपकाळे यांना गावाला जायचे असल्याने त्यांनी दुचाकी जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर लावल्याची संधी चोरट्यांनी साधत 5 फेब्रुवारी रोजी दुचाकी लांबवली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सूत्रे फिरवत आरोपीला अटक केली व चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली.



यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई भुसावळ लोहमार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे धनराज लुले, विशाल चौधरी, बाळासाहेब देवरे, बाबू मिर्झा आदींनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !