पाल परिमंडळात दुचाकीवरून अवैधरित्या डिंकाची वाहतूक : दिड लाखांचा मुद्देमाल जप्त
Illegal transport of gum on two-wheelers in Pal circle : 1.5 lakh worth of goods seized रावेर : सातपुड्यातील पाल परिमंडळात मांजल रस्त्याने अवैधरित्या डिंकाची वाहतूक करताना तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या तसेच संशयितांकडील 128 किलो डिंक मिळून एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीन अज्ञात आरोपींविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्याआधारे वन कर्मचार्यांना रावेर वनक्षेत्रातील क. नं 56 मधून मांजल रस्त्याने गस्त करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी दुचाकी क्रमांक (एम.पी. 10 एम.ई. 9516) व एचएफ डिलक्स (एम.पी.10 एम.क्यू.4492) व स्मार्ट हिरो व (एम.पी.10 एम.जी.3494) या तीन दुचाकी आल्यानंतर पथकाने त्यांना अडवल्यानंतर अंधाराचा फायदा घेत संशयीतय पसार झाले तर दुचाकीवरील साधारण 118 किलो सलाई व 20 किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला. 12 हजार 980 रुपयांचा 118 किलो सलई डिंक व चार हजार रुपये किंमतीचा 20 किलो धावडा डिंक व एक लाख 33 हजारांच्या तीन दुचाकी मिळून एक लाख 49 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ही कारवाई वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदशनाखाली वनपाल डी.जी.रायसिंग, वनरक्षक एम.एम.तडवी यांनी केली.