भुसावळात बसमधून धूर निघताच प्रवाशांमध्ये घबराट


भुसावळ : जळगावहून मेहकरकडे निघालेल्या बसच्या इंजिनातून धूर निघत असल्याचा प्रकार समोर येताच प्रवाशांमध्ये थरकाप उडाला. ही घटना बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ मंगळवारी सकाळी घडली.

चालकाने सतर्कता दाखवत रस्त्याच्या कडेला बस घेतल्यानंतर प्रवाशांना उतरवण्यात आले. तातडीने हा प्रकार भुसावळ आगारात कळवण्यात आल्यानंतर बस आगारात नेत दुरुस्ती करण्यात आली. सुदैवाने बस न पेटल्याने मोठा अनर्थ टळला. नादुरुस्त बस रस्त्यावर पार्किंग करण्यात आल्याने अर्धा तास वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !