भुसावळ अवैध गौण खनिज वाहतूक : दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल


Bhusawal Illegal minor mineral transportation: Case registered against two persons
भुसावळ : 
भुसावळ तालुक्यातील कन्हाळा बुद्रूक येथून एमआयडीसी भागात अवैधरीत्या मुरूमाची वाहतूक करणार्‍या डंपर चालक व मालकाविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अवैध गौण खनिज धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कन्हाळा बुद्रूक येथून एमआयडीसीत जात असलेल्या मार्गावर कबस्तानजवळ डंपर थांबविण्यासाठी प्रयत्न केला मात्र चालकाने डंपर न थांबविता थेट पळवले. कन्हाळा बुद्रूक येथील तलाठी माधुरी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अन्वर सुलेमान गवळी व डंपर चालक (नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. डंपरमध्ये चार हजार 400 रुपयाचा मुरूम होता. तपास हवालदार सुभान तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !