सावदा शहरात आयशरवरून पडल्याने परप्रांतीय क्लीनरचा मृत्यू
Migrant cleaner dies after falling from Eicher in Savada city सावदा : आयशर वाहनावरून पडल्याने 65 वर्षीय वयोवृद्ध क्लीनरचा मृत्यू झाला. ही घटना सावदा शहरात सोमवार, 25 मार्च रोजी घडली. मोहम्मद मतलूब (65, देहरादून, उत्तराखंड) असे मयताचे नाव आहे.
विशाल ट्रान्सपोर्ट कार्यालयाबाहेर आयशर वाहन (एच.एच.58 सी.0792) उभे असताना वाहनाच्या छतावरून पडल्याने मोहम्मद मतलूब यांचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय संजय देवरे करीत आहेत.

