धरणगावनजीक भरधाव ट्रकच्या धडकेने विखरणच्या दोघांचा मृत्यू


Two people from Vikharan died after being hit by a speeding truck near Dharanavan धरणगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात विखरण येथील दोघा प्रौढांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडला. युवराज काशीनाथ महाजन (50) व मच्छिंद्र सीताराम पाटील (50, दोन्ही रा.विखरण, ता.एरंडोल) अशी मयतांची नावे आहेत.

अपघातानंतर ट्रक चालक पसार
युवराज काशिनाथ महाजन हे दुचाकी (एम.एच.19-4490) वरून सहकारी मच्छिंद्र पाटील यांच्यासोबत दोघे वर्डी, ता.चोपडा येथे सुखनाथ महाराजांच्या भंडार्‍यासाठी गेले होते. चोपड्याकडून येत असताना धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस. ट्रेडिंगजवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर मच्छीद्र पाटील हे गंभीर जखमी झाले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. याबाबत धरणगाव पोलिसात विठ्ठल तुळशीराम महाजन यांनी दिल्यावरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ल तपास पीएसआय करीम सैय्यद हे करीत आहे. अपघात घडल्यानंतर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गोपाल पाटील, अमोल चौधरी, गौतम सोनवणे, विनोद रोकडे, गजानन महाजन आदींनी धाव घेत जखमीला उपचारार्थ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !