पाल येथे घरफोडी : 64 हजारांचा सोन्याचा हार लांबवला
Burglary at Pal: Gold necklace worth 64 thousand recovered पाल, ता.रावेर : बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी 16 ग्रॅम वजनाचा व 64 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार लांबवल्याचा प्रकार गावात 23 ते 24 मार्चदरम्यान घडल्याने गावात खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रदीप अर्जुन जाधव (35, पाल) हे शेती व्यवसाय करून कुटूंबासह पाल येथे वास्तव्यास आहेत. 23 ते 24 दरम्यान त्यांचे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील तिजोरीचे लॉक तोडून 16 गॅ्रम वजनाचा सोन्याचा हार लांबवला. जाधव हे घरी आल्यानंतरचा घरफोडीच प्रकार लक्षात आला. रावेर पोलिसांना सूचित केल्यानंतर त्यांनी धाव घेत पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.

