मुक्ताईनगरात कत्तलीपूर्वीच गोवंशाची सुटका : दोघांविरोधात गुन्हा


Release of cattle before slaughter in Muktainagar: Crime against two मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिसांनी गोवंशाची वाहतूक करणार्‍या आयशर वाहनाला पकडत 11 गीर गायींसह पाच वासरूंची सुटका केली. याप्रकरणी दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोवंशाची सुटका : दोन आरोपींविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर-भुसावळ रस्त्यावरील हॉटेल फ्लोराजवळ गुरांनी भरलेला आयशर मुक्ताईनगर पोलिसांनी रविवार, 24 रोजी रात्री 12.20 वाजता अडवत त्यातून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार्‍या 11 गीर गायींसह पाच वासरांची सुटका केली. याप्रकरणी कॉन्स्टेबल रमेश खोडपे यांच्या तक्रारीवरून भूषण नानाभाऊ गर्दे (29, अवधान एमआयडीसी परिसर, भुसावळ) व अया लाला कुरेशी (25, हमसाबाद, ता.फतीयाबाद) यांच्याविरोधात प्राणी अधिनियम व मुंबई पोलीस अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संदीप खंडारे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !