शिरसाड येथे चोरी करताना पकडलेल्या तरुणाची कोठडीत रवानगी


Youth caught stealing in Shirsad sent to custody यावल : यावल तालुक्यातील शिरसाड येथे एका पानटपरीत चोरी करतांना पाच जणांचे टोळक्याला ग्रामस्थांनी पकडले होते मात्र ग्रामस्थ येताच चौकडी पसार झाली तर फैजान उर्फ दानिश खान अरीफ खान (19, रा.तांबापुरा, जळगाव) याला पकडण्यात यश आले होते.

पसार साथीदारांचा कसून शोध
आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तरुणासह त्याच्या साथीदारांनी पानटपरी सह साकळी गावातील जितेंद्र गोकूळ नेवे उर्फ छोटूबाबा यांच्या घरातून देखील साहित्य चोरी केल्याचे समोर आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात उमेश धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत फैजान उर्फ दानिश खान अरिफ खान यास सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवार, 26, मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !