साकेगाव येथे एकास मारहाण : दोघांविरोधात गुन्हा
One beaten up in Sakegaon : Crime against two भुसावळ : किरकोळ वादातून साकेगाव येथे तरुणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवार, 24 रोजी रात्री 9.30 वाजता घडली.
पवन अशोक सपकाळे (26, आंबेडकर नगर, साकेगाव) या तरुणाच्या तक्रारीनुसार, संशयित शशी प्रकाश उपासे याने शिविगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली तर हरचंद शिवा उपासे (आंबेडकर नगर, साकेगाव) याने शिविगाळ केली. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.

