फायनान्सचे हप्ते न भरल्याने मारहाण : भुसावळातील पाच संशयितांविरोधात गुन्हा


Beating up for non-payment of finance installments : Crime against five suspects in Bhusawal भुसावळ : फायनान्सचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून युवकाला मारहाण करण्यासाठी माजी नगरसेवक पूत्रांसह काही संशयीतांनी दुचाकीवरून सिनेस्टाईल पाठलाग केला होता तर जीव वाचवण्यासाठी युवकाने पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आश्रय घेतला होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी माजी नगरसेवक शफि पहेलवान यांच्या पूत्रासह पाच संशयितांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण करण्यासाठी युवकाचा सिनेस्टाईल पाठलाग
अझहर खान सलीम खान (33, इमामवाडा, तीन नंबर शाळेजवळ, भुसावळ) या युवकाने एचडीबी फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर फ्रिज घेतले आहे मात्र आर्थिक परीस्थितीमुळे दोन हप्ते भरता आले नाहीत. याबाबत संशयीत वसीम शेख शफि याने 24 रोजी सायंकाळी पाच वाजता जाब विचारल्यानंतर तक्रारदाराने धंदा व्यवस्थित सुरू नाही, खूपच अडचण आहे मात्र मागील हप्ते व चालूचा हप्ता लवकरच भरण्यात येईल, असे सांगितल्याचा संशयीत वसीमला राग आल्याने त्याने तक्रारदाराला शिविगाळ करीत दोन कानाखाली वाजवल्या व यावेळी तक्रारदाराने पोलिसात तक्रार करू, असे सांगितल्यानंतर संशयिताने जेथे जायचे तेथे जा, असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता तक्रारदार कुटूंबासह रमजानचा उपवास सोडत असताना संशयित घरी आले व त्यांनी फिर्यादीची पत्नी व आईला शिविगाळ केली तसेच पोलिसात गेल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. यावेळी वसीम शेख याने हातातील काठीने तक्रारदाराच्या पायावर व पाठीवर मारहाण केली. यावेळी जीव वाचवण्याच्या भीतीने पोलीस ठाण्यात तक्रारदार निघाल्यानंतर पाच ते दहा संशयीतांनी दुचाकीवरून सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. तक्रारदार बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर संशयीतांनी तेथेही गाठल्यानंतर तक्रारदार पोलीस उपअधीक्षक कार्यालयात पोहोचला. यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घडला प्रकार जाणून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.



या संशयितांविरोधात गुन्हा
याप्रकरणी तक्रारदार अझहर खान सलीम खान (33, इमामवाडा, तीन नंबर शाळेजवळ, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून, वसीम शेख शफी, बिट्टू शेख शफी, दानिश शेख सलीम, बिसमिल्ला शेख शेख रहिम, इमाम शेख गफूर (सर्व रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !