गिरणा धरणातून दोन हजार क्यूसेसचे आवर्तन सुटले ; नागरिकांनी मानले गुलाबभाऊंचे आभार !
निम्म्या जिल्ह्याची तहान भागणार ; आवर्तन सुटल्याने पुढील 50 दिवसांची चिंता मिटणार !
धरणगाव : निम्म्या जिल्ह्याची तहान भागणार ; आवर्तन सुटल्याने पुढील 50 दिवसांची चिंता मिटणार ! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटले आहे. निम्म्या जिल्ह्याची तहान भागणार असून नागरिकांनी गुलाबभाऊंचे आभार मानले आहेत. दरम्यान, गिरणा धरणातून निम्म्या जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो.
पहाटे सुटले आवर्तन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हाधिकार्यांनी कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, यांना दिलेल्या आदेशानुसार शुक्रवार, 24 मे 2024 रोजी पहाटे सहा वाजता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचन पाणीवापराचे चौथे आवर्तन दोन हजार क्यूसेस (56.63 र्उीाशली) इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

सतर्कतेचा इशारा
पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानळदापर्यंत पोहोचणार आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीचे असल्याने सर्व शेतकर्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
या आवर्तनामुळे कानळदा व इतर परिसरातील नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला असल्याने नागरिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच निम्म्या जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीबाणीत आवर्तनामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर आवर्तन सुटल्याने पुढील 50 दिवसांची चिंता मिटणार आहे. या पाण्यामुळे निम्म्या जिल्ह्याची तहान पुढील काही दिवसांसाठी भागणार आहे.
