स्कॉर्पिओ दरीत कोसळून दोघे ठार : दोन जण गंभीर


सातारा : 500 फूट दरीत स्कॉर्पिओ कोसळून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. सातार्‍यातील यवतेश्वर घाटातील गणेश खिंडीत हा अपघात झाला.

सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेल्या कास पठाराकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या गणेश खिंडीत हा अपघात झाला. यामध्ये स्कॉर्पिओ गाडी थेट 500 फूट खोल दरीत कोसळली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या स्कॉर्पिओ गाडीत सात जणांचा समावेश होता. त्यापैकी 2 जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !