भोकरबारी धरणात बुडून पारोळ्यातील तिघा भावंडांचा मृत्यू

पोहता येत नसल्याने दुर्घटना : दोघे पाण्यात न उतरल्याने बचावले


Three siblings of Parola drowned in Bhokarbari dam पारोळा : दर्ग्यावर दर्शनासाठी आलेल्या तिघा भावंडांचा भोकरबारी धरणात बुडाल्याने मृत्यू झाला तर सुदैवाने दोघे बचावले. ही घटना शनिवार, 3 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. ही घटना वंजारी शिवारात असलेल्या भोकरबारी धरणात घडली.

पोहता न आल्याने तिघे बुडाले
पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरातील पाच अल्पवयीन मुले शनिवार, 3 रोजी पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरवारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (16), इजाज रजा न्याज मोहम्मद (14, रा. बडा मोहल्ला पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (17, रा.मालेगाव जि. नाशिक) हे धरणाच्या पाण्यात उतरले मात्र त्यांना पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला.

पाण्यात बुडून मृत्यू
बुडालेल्यांना वाचवण्यासाठी आश्रम पीर मोहम्मद (9), इब्राहिम शेख अमीर (14) यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतल्यानंतर प्रशासन व ग्रामस्थांनी धाव घेतली मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !