नाशिकच्या रामकुंडावर आईदेखत मुलगा वाहिला
नाशिक : नाशिक शहरासह जिल्हाभरात गत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती आहे. त्यातच तीर्थस्थळ असलेल्या रामकुंडात एक 29 वर्षीय तरुण वाहून गेला. आईच्या समोरच तरणाबांड वाहून गेल्याने तिच्या आक्रोशाने अनेकांचे डोळे पाणावले. तर
29 वर्षीय तरुण वाहिला
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीपात्रात पूरसदृश स्थिती आहे. रामकुंड येथे 29 वर्षीय तरुण आईच्या डोळ्यादेखील वाहून गेला. 29 वर्षीय पर्यटकाला शोधण्यासाठी प्रशासनाचे शोध कार्य सुरू आहे तर तीन वर्षाची मुलगी देखील पाण्यात पडली मात्र, तिला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले.


नाशिकला आज ऑरेंज अलर्ट
दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे, तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
