जे.एस.पापळकर धुळ्याचे नूतन जिल्हाधिकारी : अभिनव गोयल यांची बदली


Dhule Collector JS Papalkar  धुळे (6 ऑगस्ट 2024) : धुळ्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जे.एस.पापळकर यांची नियुक्ती शासनाने केली. याबाबत अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी सोमवारी अध्यादेश जारी केला.

2010 बॅचचे आयएएस अधिकारी
जे.एस.पापळकर हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हाधिकारी म्हणून यापूर्वी सेवा बजावली आहे. सद्य:स्थितीत ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. शासनाने त्यांची धुळे जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे. धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निघणार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !