जलंब-शेगाव दरम्यान उद्या रेल्वेचा ब्लॉक : भुसावळ-वर्धा, बडनेरा-नाशिक मेमू रद्द


Railway block tomorrow between Jalamb-Shegaon : Bhusawal-Wardha, Badnera-Nashik memo canceled भुसावळ (7 ऑगस्ट 2024) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जलंब-शेगाव दरम्यान रेल्वेच्या कामानिमित्त गुरुवार, 8 ऑगस्टला ब्लॉक घेण्यात आल्याने भुसावळ-वर्धा मेमू, बडनेरा-नाशिक मेमू रद्द करण्यात आली तर चार गाड्या या विविध स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे. गुरुवारी शेगावला जाणार्‍या भाविकांची संख्या अधिक असल्याने या दिवशी रेल्वेने ब्लॉक घेतला असल्याने भाविकांची अडचण होणार आहे.

चार गाड्या विविध स्थानकावर थांबणार
जलंब-शेगाव दरम्यान रेल्वे प्रशासनाने काम हाती घेतल्याने गुरुवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. या मार्गावरून ये-जा करणार्‍या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून चार गाड्या या विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे. नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कामामुळे प्रवासी गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

या रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ-वर्धा मेमू ही गाडी गुरुवार, 8 रोजी रद्द तर वर्धा-भुसावळ मेमू ही गाडी शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. बडनेरा-नासिक मेमू गुरुवार, 8 रद्द तसेच नाशिक-बडनेरा विशेष गाडी 8 रोजी रद्द करण्यात आली आहे.

या गाड्या विलंबाने धावणार
ओखा-पुरी एक्सप्रेस ही गाडी 8 ऑगस्टला भुसावळ विभागात 1.30 तास थांबविली जाणार आहे तर गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी 8 ऑगस्टला विभागातील कुठल्याही स्थानकावर 1 तास 10 मिनिटे थांबविली जाणार आहे. नांदेड-श्रीगंगानगर एक्सप्रेस ही गाडी 8 रोजी विभागात 30 मिनिटे थांबविली जाईल. बडनेरा-भुसावळ मेमू ही गाडी गुरुवार, 8 रोजी विभागात 45 मिनिटे थांबविण्यात येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !