जळगावहून तिरुपतीसह इंदौर व अहमदबादसाठी विमानसेवा सुरू होणार !

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचे आश्वासन


Air service to Indore and Ahmedabad from Jalgaon to Tirupati will start! भुसावळ (7 ऑगस्ट 2024)  : जळगाव विमानतळावरून तिरुपतीसह इंदौर व अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी नवी दिल्ली येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांच्याकडे भेटीदरम्यान केली. यावेळी मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

मुंबईसाठी दररोज विमानसेवेची मागणी
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, जळगाव विमानतळावर आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाईट लँण्डींग अश्या स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधा आहेत. जळगावहून मुंबई व पुण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा असलीतरी व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी पुण्यासाठी सायंकाळी व मुंबईसाठी सकाळी दररोज विमानसेवा सुरू करावी. दोन्ही मागण्यांबाबत दखल घेण्याचे आश्वासन मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !