प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा
Express trains stop at selected stations for the convenience of passengers भुसावळ (7 ऑगस्ट 2024) : मध्य रेल्वेने कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता थांबा जाहीर केला आहे. 6 ते 12 ऑगस्टपर्यंत या स्थानकांवर गाड्या थांबतील.
भिलवडी आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा
ट्रेन क्रमांक 16210 म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 16506 बेंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 16508 बेंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 16532 बेंगळुरू-अजमेर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 16534 बेंगळुरू- जोधपूर एक्स्प्रेस तर ताकारी स्थानकावर गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 11040 गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. कराड स्थानकावर ट्रेन क्रमांक 16533 जोधपूर-बेंगळुरू एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 16534 बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 11049 अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 11050 कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला. प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

