वाहनधारकांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या दौर्‍यामुळे जळगावात वाहतूक मार्गात बदल


Traffic route changes in Jalgaon due to Prime Minister’s visit on August 25 जळगाव (22 ऑगस्ट 2024) : राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवार, 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौर्‍यावर येत आहेत. जळगाव विमानतळासमोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे त्यांची सभा होत आहे. सभा स्थळ हे जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्ग क्रमांक 753 एफ वर असल्याने मार्गावरील रहदारीचे नियमन व कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये याकरीता जळगाव शहरातील व जिल्हयातील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

हलक्या व जड वाहनांना प्रवेश बंद
रविवार, 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात ते सायं सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची (अत्यावश्यक सेवा वगळून) तात्पुरते मार्गात बदल व मार्ग बंद करण्यात येणार आहे.



रविवार, 25 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळ ते नेरी, ता.जामनेर हा मार्ग सर्व प्रकारच्या अवजड व हलके वाहनांना येण्यास व जाण्यास बंद असेल.

पर्यायी मार्गात तात्पुरता बदल
जळगावकडून नेरी, पहुर, छत्रपती संभाजीनगर कडेस जाणा-या वाहनांनी जळगाव शिरसोली वावडदामार्गे-नेरी या मार्गाचा जाण्यासाठी वापर करावा. तसेच छत्रपती संभाजीनगर, पहुर, जामनेरकडून येणार्‍या वाहनांनी नेरी – वावडदा-शिरसोलीमार्गे जळगाव या मार्गाचा येण्यासाठी वापर करावा.

नेरी, गाडेगाव, उमाळा चिंचोली, देव्हारी, करमाड, पळासखेडे, जळके (तांडा) या गावाकडुन जळगावला येणा-या वाहनांसाठी वावडदा, शिरसोली मार्गे जळगाव या पर्यायी मार्गाचा सायंकाळी सहा वाजेपर्यंत वापर करावा, असे आवाहन जळगाव पोलीस अधीक्षक् डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !