भुसावळात विघ्नहर्त्याचा मार्ग खडतर : खड्ड्यांच्या निषेधार्थ जगन सोनवणे यांच्या आंदोलनाने वेधले लक्ष
भुसावळ (6 सप्टेंबर 2024) : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत असताना भाविकांमध्ये उत्साह व जल्लोषाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र शहरातील सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहे. यंदाही गेल्या वर्षाप्रमाणे गणरायाचे आगमन हे खड्डेमय रस्त्यातून होणार असल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया संविधान आर्मीचे जगन सोनवणे यांनी यांनी डोक्यावर गणपतीची मूर्ती घेऊन गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केले.
20 रोजी रेल रोको आंदोलन
शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले असून गणेशाचे आगमन जवळ आल्यानंतरही पालिकेच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यात न आल्याच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या माजी सदस्या पुष्पा सोनवणे, कामगार नेते, माजी नगरसेवक जगन सोनवणे व त्यांच्या सोबत 10 संघटनांच्या पदाधिकार्यांनी गांधी पुतळ्याजवळ खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर 20 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार्या राज्यव्यापी आक्रोश रेल रोको आंदोलन छेडले जाणार आहे. आमदार संजय सावकारे यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली.





