निंभोरा येथील सचिन महाले सरपंच सम्राट पुरस्काराने सन्मानीत


निंभोरा, ता.रावेर (9 सप्टेंबर 2024) : ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन सुरेश महाले यांना एन.बी. सोशल सामाजिक ग्रुपच्या वतीने जळगाव जिल्ह्यातून एकमेव सरपंच सम्राट म्हणून सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्याची दखल घेत पुरस्कार
राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 5 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी व रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, एन.बी.सोशल समूहाचे संजय मलमे व ग्रुप प्रेसिडेंट ए.श्रीनिवास व त्यांच्या टीमने सन्मानीत केले. सरपंच सचिन महाले यांनी निंभोरा येथे 16 फेब्रुवारी 2021 पासून ते आजतागायत गावाच्या अधिकाधिक सर्वांगीण विकासासाठी धडपड चालवली असून या विकासकामांची दखल घेत त्यांना जिल्हाभरातून एकमेव असा सरपंच सम्राट पुरस्कार देवून जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सरपंच यांनी महिलांना अहिल्याबाई पुरस्काराने सन्मानित केले तसेच रिंग रोडचे काँक्रीटीकरण, विविध प्रकारचे आरोग्य विषयक शिबिर, दिव्यांग बांधवांसाठी किराणा कीट वाटप तसेच कोरोना काळात तत्परतेने केलेले उल्लेखनीय कार्य, माजी सैनिकांच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण, डास नियंत्रण फवारणी, तसेच गावातील एकोप्यासाठभ प्रयत्न, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला इमारत, तसेच नवीन ग्राम सचिवालय इमारत, कचरा संकलनासाठी घंटागाडी आदी कामे केल्याने या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !