भुसावळात भाजपातर्फे ज्ञानेश महारावसह शरद पवारांचा निषेध

संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य काढणार्‍यांवर कायदेशीर कारवाईची मागणी


Protest of Sharad Pawar along with Dyanesh Maharao by BJP in Bhusawal भुसावळ (13 सप्टेंबर 2024) : शरदचंद्र पवार गटाचे ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मातील देव-देवतांचा अपमान करीत वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणारे बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी दुपारी 12 वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील भाजपा पदाधिकार्‍यांनी जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिरासमोर आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात एकत्र येत ज्ञानेश महाराव व शरद पवारांचादेखील निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. वारकरी संप्रदायाचाही या आंदोलात सहभाग होता.

तर हिंदू धर्म सोडा
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिंदू द्वेष करणे सोडावे अन्यथा हिंदू धर्मापासून अलिप्त व्हावे, असे भुसावळचे आमदार संजय सावकारे यावेळी म्हणाले.


यांचा आंदोलनात सहभाग
भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांच्यासह जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, मनोज बियाणी, चंद्रशेखर अग्रवाल,
राजेंद्र आवटे, राजेंद्र चौधरी, पुरूषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, बापू महाजन, देवेंद्र वाणी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, नितीन धांडे, गणेश धनगर, अजय नागराणी, निक्की बत्रा, दिनेश नेमाडे, धनराज बाविस्कर, प्रशांत निकम, शैलजा पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, अनु.जाती.मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे, संतोष ठोकळ, गौरव लोणारी, दीपक सोनवणे, प्रेमचंद तायडे, नरेश खंडारे, चेतन बोरोले, भावेश चौधरी यासह पदाधिकारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !