वरणगावनजीक ट्रक चोरीचा बनाव उघड : फिर्यादीसह तिघांना पोलिसांकडून अटक
Fake truck theft revealed near Varangaon : Police arrested three people along with the prosecutor भुसावळ (14 सप्टेंबर 2024) : भुसावळ-वरणगाव महामार्गावरील एका हॉटेलवरून रात्रीच्या वेळी ट्रक लांबवण्यात आला होता. वरणगाव पोलिसांनी फिरवलेल्या तपास चक्रात फिर्यादी ट्रक चालकासह अन्य दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या मात्र ट्रकच्या तपासासाठी पथक धुळ्याला गेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ट्रकची विल्हेवाट लावत नोंदवली तक्रार
पाळधी येथील ट्रक चालक अरबाज खान तस्लीम (27, रा.पाळधी, ता.धरणगाव) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्रमांक एम.एच. 43 वाय. 8087) ने भुसावळ – वरणगाव महामार्गाने येत असतांना वरणगाव नजीकच्या महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर 5 सप्टेंबर रोजी रात्री थांबला होता मात्र रात्री ट्रक चोरीला गेल्याचे चालकाच्या सकाळी लक्षात आल्याने त्याने याबाबतची माहिती ट्रक मालकाला देवून 8 सप्टेंबर रोजी वरणगाव पोलिसात तक्रार नोंदवली.
फिर्यादी चालक अरबाज खान तस्लीम व त्याचा साथीदार क्लिनर तस्लीम अयुब खान (54, रा.60 घर मोहल्ला, दोघे रा.पाळधी) व युसूफ खान अमीर (48, रा.जामनेर) यांना बुधवार, 11 रोजी अटक करण्यात आली मात्र ट्रकच्या शोधार्थ पथक धुळ्यात शुक्रवारी रवाना झाले. सहा.निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.