लग्न करण्याचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार

0

जळगाव (15 सप्टेंबर 2024) : शिक्षिकेवर लग्नाच्या आमिषाने एका शिक्षकाने तीन वर्ष अत्याचार केला. शिक्षिकेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर 13 सप्टेंबर रोजी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

वारंवार केला अत्याचार
एका शाळेतील शिक्षिकेसोबत प्रशांत झाल्टे याने सहानुभुती दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले तसेच तू मला आवडते, असे सांगून तिला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. शिक्षिकेने त्याला
लग्नाविषयी विचारले असता तो नकार देऊ लागला.

शिक्षकासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल
अखेर या प्रकरणी शिक्षिकेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शिक्षक प्रशांत झाल्टे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाच्या आईविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय विठ्ठल पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.