मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले ; कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार !

0

The Chief Minister clearly said; Reservations will be given within the framework of the law! छत्रपती संभाजीनगर (17 सप्टेंबर 2024) : कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करणारे आरक्षण मराठा समाजाला देणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. दिलेला शब्द पाळणारे हे सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत सरकारने सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकार्‍याची भूमिका घेतली पाहिजे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी
आंतरवाली सराटीत छेडलेल्या उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मराठा समाजाची आरक्षणाबाबत सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगे-पाटील यांनी देखील सहकार्‍यांची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मराठा समाजाचा वापर करून घेणार्‍यांना जाब विचारणार की नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कोणाचीही दिशाभूल करणार नाही,
आरक्षणाबाबत कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे, ते सर्व देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरक्षणाबाबत कोणाचीही फसवणूक करणार नाही.

 


कॉपी करू नका.