भुसावळातील लेवा प्रतिष्ठानतर्फे महिला सुरक्षेबाबत फलकातून जनजागृती
पारंपरीक वाद्यांचा वापर करीत बैलगाडीतून काढली मिरवणूक : भ्रष्टाचारासह वाहन नियमांची जनजागृती
भुसावळ (18 सप्टेंबर 2024) : विघ्नहर्त्या गणरायाला सर्वदूर गणेश भक्तांनी सर्वत्र साश्रू नयनांनी ढोल-ताशांच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. भुसावळातील लेवा प्रतिष्ठान मंडळानेही गणरायांना निरोप दिला मात्र कर्णकर्कश डीजेला फाटा देत मंडळाने केवळ पारंपरीक वाद्याचा वापर करून बैलगाडीद्वारे मिरवणूक काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले शिवाय मिरवणुकीत तब्बल 101 समाजोयोगी पोस्टरद्वारे जनजागृती केली. या अनोख्या उपक्रमाचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी विशेष कौतुक केले. पोस्टरद्वारे महिला अत्याचार, वाहतूक नियम तसेच हिंदू जनजागृती करण्यात आली.
महिला सुरक्षेबाबत जनजागृती
शहरातील विविध मंडळांनी गणरायांना मंगळवारी निरोप दिला. शहरातील लेवा प्रतिष्ठान मंडळातर्फे मात्र विसर्जन मिरवणुकीत केवळ पारंपरीक वाद्याचा वापर करण्यात आला तसेच गणरायांची विसर्जन मिरवणूक बैलगाडीतून काढून प्रदूषण टाळण्यात आले शिवाय महिलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार, तसेच वाहतूक नियम, हिंदू जनजागृती आदी विषयांवर 101 पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या मिरवणुकीमुळे शहरवासीयांनी या मंडळाचे कौतुक केले.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेसाठी राकेश धांडे, रितेश भारंबे, अक्षय तळेले, केतन अत्तरदे, रोहन वांगी, राकेश धांडे, रितेश भारंबे, अक्षय तळले, केतन अत्तरदे, रोहन वाणी, निकेत नेमाडे, गौरव पाटील, पुष्कर वाणी, तुषार कुरकुरे, मंगेश कवठे, विशाल पाटील, धीरज बर्हाटे, भावेश नेमाडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




