पेव्हर ब्लॉक खचल्याने चक्क टँकर बुडाला खड्ड्यात : पुण्यातील घटनेने खळबळ


A tanker sank in a pit when the paver block collapsed : The incident in Pune caused excitement पुणे  (20 सप्टेंबर 2024)  : अचानक पेव्हर ब्लॉक खचल्याने टँकर खड्ड्यात जावून बुडाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. या घटनेत सुदैवाने प्राणहानी टळली. पुण्यातल्या समाधान चौकात सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात साफसफाई करण्यासाठी टँकर आल्यानंतर ही दुर्घटना घडली.

अशी आहे नेमकी घटना
सिटी पोस्ट कार्यालयाच्या समोर पुणे महानगरपालिकेचा टँकर ड्रेनिजची साफसफाई करण्यासाठी हा टँकर सिटी पोस्टच्या आवारात आला. यावेळी चालकाने हळूहळू टँकर पुढे घेण्यास सुरुवात केल परंतु अचानकच तो टँकर मागे जाऊ लागला. पुढची चाकही वर येऊ लागली. प्रसंगावधान चालकाच्या लक्षात आले. आणि त्याने झटकन टँकरमधून उडी मारली. क्षणातच टँकर पेंव्हींग ब्लॉकच्या रस्त्यावरून खड्ड्यात गेला. वेळप्रसंगी चालकाला कळल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !