चोपडा तालुका हादरला : 45 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून खून


Chopra taluka shook : 45-year-old woman killed in immoral relationship चोपडा (27 सप्टेंबर 2024) : 45 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे पाच वाजता चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द गावात घडली. खुनामागे अनैतिक संबंध असल्याचा वाद समोर आला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात मारेकर्‍याविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.

असे आहे खून प्रकरण
चोपडा तालुक्यातील गोरगावले गावात 45 वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. तिचे गावातील अनिल विरजी पावरा (35) याच्या सोबत बर्‍याच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. यातून दोघांमध्ये सारखी भांडण होत होती. याच कारणावरून 24 सप्टेंबर रोजीच्या रात्री 10 ते 25 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी अनिल पावरा ह्याने कशानेतरी गळा आवळून खून केला.

अडावद पोलिसांची धाव
ही घटना 25 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता उघडकीला आल्यानंतर अडावद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. पोलीसांनी संशयित आरोपी अनिल पावरा याला अटक केली. महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल वीरजी पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !