दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सेंधव्यातील दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा


धरणगाव (28 सप्टेंबर 2024) : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना 26 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता घडली होती. या प्रकरणी तपासाअंती अपघातास कारणीभुत दुचाकी चालक राहुल बारेला (रा. फतरीया ता. सेंधवा. म.प्र.) याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात रविवार, 22 रोजी गुन्हा दाखल झाला.

दुचाकी अपघातात मृत्यू
जगदीश काशीनाथ सुर्यवंशी (45, रा.भवरखेडा, ता.धरणगाव हे दुचाकी (क्रमांक जी.जे.05 जी.क्यू 1697) ने धरणगाव उड्डाणपूलावरून धरणगाव रेल्वे स्टेशनकडे जात असतांना समोरून येणारी दुचाकी (क्रमांक एम.पी. 46 एम.पी.5783) वरील चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये जगदीश सुर्यवंशी याचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत प्रकरणी दुचाकीस्वार राहूल बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार चंद्रकांत पाटील तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !