आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने 70 कोटींच्या निधीतून चाळीसगाव तालुक्यातील वीज यंत्रणा होणार सक्षम !
सहा गावांना नवीन वीज उपकेंद्र मंजूर तर 3 उपकेंद्रांची क्षमता वाढणार : चाळीसगाव तालुक्यातील विद्युत ग्राहकांना मिळणार विनाविलंब विद्युत जोडणी व अखंडित वीजपुरवठा
चाळीसगाव (29 सप्टेंबर 2024) : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील महावितरणच्या चाळीसगाव विभागाअंतर्गत येणार्या 6 गावांना नवीन उपकेंद्रे तसेच तीन गावांच्या उपकेंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. यामुळे गावांकरिता येणार्या 2030 पर्यंत ची गावांना लागणारी वीज व त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर विद्युत उपकरणे संच मांयुणी साठी ए.आय.आय.बी (आर.डी 55) (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक) या योजनेअंतर्गत चाळीसगाव विभागीय कार्यातमयासाठी एकूण 70 कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
सहा उपकेंद्राची निर्मिती
या योजनेमध्ये नवीन सहा उपकेंद्राची निर्मिती होणार आहे. या उपकेंद्राची एकूण क्षमता (55 मेगावॅट) असणार आहे. त्यात तरवाडे गाव, बिलाखेड, टाकळी प्र.चा., डेराबर्डी, खडकी, चाळीसगाव येथे उपकेंद्र असेल तर तीन उपकेंद्रांची एकूण 15 मेगावॅट क्षमता वाढविली जाणार आहे. त्यात शिरसगाव तळेगाव व गणेशपूरची क्षमता प्रत्येकी पाच मेगावॅट वाढवली वाढविली जाणार आहे. दरम्यान, 150 डीपीदेखील बसवल्या जाणार आहेत.

2030 पर्यंतची वीज मागणी पूर्ण होणार
ही नवीन योजना भविष्याचा विचार करून तयार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मंजूर असलेली सर्व उपकेंद्र व विद्युत रोहित्राची कामे विहित वेळेत पूर्ण झाल्यास चाळीसगाव तालुक्यातील गावांची यंत्रणा ही पुढील दहा वर्षे (2030) पर्यंत लागणारी वीज मागणीची पूर्तता करेल.
या योजनेमुळे विना विलंब जोडणी विद्युत ग्राहकांना मिळेल, विद्युत मंडळास ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा करण्यास मदत होईल सोबतच योग्य दाबाने विद्युत पुरवठा करणे देखील सोयीस्कर होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कर्मचार्यांनादेखभाल व दुरुस्ती करणे सुकर होईल यामुळे वीज यंत्रणेवरील ताण देखील निश्चितपणे कमी होणार आहे.
ही योजना मंजूर करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा केला व त्यांच्या अथक प्रयत्नातून वीजयंत्रणा सक्षम करण्यासाठी व ग्राहकास योग्य दाबाने व उच्च प्रतीचा अखंडित विद्युत पुरवठा करणेकामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उ पमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने योजना मंजूर करून घेतली असल्यानचे आमदार चव्हाण यांनी सांगितले व त्यांचे आभार मानले. या योजनेमुळे आमदार चव्हाण यांच्या पावरला महायुतीच्या मंत्री मंडळाचा पावरफुल पुरवठा असल्याचे स्पष्ट होते. या पॉवरमुळे चाळीसगाव तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पॉवरफुल होणार यात शंका नाही.