स्व.लता मंगेशकर यांच्या जन्मदिवसनिमित्त 600 कर्तृत्वानांचा सन्मान


निंभोरा बु.॥ (03 ऑक्टोबर 20240) :  स्व.लता मंगेशकर यांच्या जन्मदिवसनिमित्त निंभोरा स्टेशन येथे कोरोना काळात, सामाजिक क्षेत्रात व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवक-युवतीं, महिला, पुरुषांचा सन्मान करण्यात आला. संगीताचा ‘यादो का सफर’ या कार्यक्रमाचे संयोजक राजीव बोरसे यांनी केले. दीपप्रज्वलन जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, पंचायत समितीचे माजी सभापती ज्योती प्रल्हाद बोंडे, जि.प.चे माजी सदस्य पूनम दुर्गादास पाटील, सुरेश पाटील, सहा.निरीक्षक हरिदास बोचरे, डिगंबर चौधरी, दुर्गादास पाटील, नरेंद्र ढाके यांनी केले. प्रास्ताविक संयोजक राजीव बोरसे यांनी केले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
यानंतर निंभोरा आरोग्य केंद्र, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, निंभोरा ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व कर्मचारी, विद्युत कंपनी कर्मचारी, पोलिस, होमगार्ड, पत्रकार, कलावंत, डॉक्टर, वकील, यासह विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या कर्तुत्वानांचा सन्मान पत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान रावेर आमदार शिरीष दादा चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, डॉ.केतकी पाटील, धनंजय चौधरी, विनोद सोनवणे, श्रीकांत महाजन, माजी उपनगराअध्यक्ष नंदा लोखंडे, पं.स.चे माजी सदस्य दीपक पाटील, सहा.निरीक्षक हरिदास बोचरे यासह मान्यवर दपस्थित होते.

 


कॉपी करू नका.