अट्टल दुचाकी चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात : चोपडा हद्दीतून लांबवलेल्या चार दुचाकी जप्त
Attal two-wheeler thieves in Jalgaon crime branch’s net: Four two-wheelers seized from Chopra area जळगाव (06 ऑक्टोबर 2024) : जळगाव गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करीत त्याच्याकडून चोपडा शहर व ग्रामीण हद्दीतून लांबवलेल्या तीन दुचाकीसह अन्य एक दुचाकी जप्त करण्यात आली. करण लक्ष्मण गायकवाड (रा.कल्याणेहोळ ता.धरणगाव) व गोपाल सुरेश भील (22, रा.वराड ता. चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, भुषण पाटील, महेश सोमवंशी आदींनी ही कारवाई केली.

