जळगावात तलवार बाळगून दहशत : मेहरुणचा संशयीत जाळ्यात


जळगाव (10 ऑक्टोबर 2024) : हातात धारदार तलवार बाळगून लोकांवर दहशत निर्माण करणार्‍या संशयित शैबाज शेख बाबू शेख (20, रा.मास्टर कॉलनी मेहरुण) यास टअटक करण्यात आली व त्याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म क्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मंगळवार, 8 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास संशयित शेरा चौक परिसरात बाँम्बे बिर्यानी केटर्सच्या समोर सार्वजनिक जागी हातात तलवार घेऊन वावरत होता. या प्रकाराने लोकामध्ये घबराट पसरली. ही वार्ता कळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. तपासाअंती या प्रकरणी संशयिताविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवार, 9 रोजी गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !