जळगावात पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा बाळगणार्‍या अटक


जळगाव (10 ऑक्टोबर 2024) : 500 रुपये दराच्या तब्बल 48 हजार रुपये किंमतजीच्या बनावट भारतीय चलनी नोटा बाळगताना संशयित पोलिसांना मिळून आला. संशयिताकडून या नोटा तसेच त्याच्या ताब्यातील बुलेट जप्त करण्यात आली. चेतन शांताराम सावकारे (27, रा.पुण्यनगर कॉलनी, यावल) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई
बुधवार, 9 रोजी संशयित बुलेट (क्रमांक एम.एच.सी.एल.2221) ने सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील आर. आर. विद्यालयाच्या शेजारील गल्लीमध्ये आला होता.नकली नोटा संदर्भात गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाज्यानंतर संशयीताला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडे 500 रुपये मुल्याच्या सुमारे 97 नकली नोटा आढळल्या. त्याचे मूल्य 48 हजार 500 रुपये आहे. बनावट चलनी नोटा बाळगल्याप्रकरणी संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पीएसआय उल्हास चर्‍हाटे हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !