जळगाव हादरले : विवाहितेची अज्ञात कारणावरून निर्घृण हत्या


Jalgaon shaken: Brutal murder of married woman for unknown reasons जळगाव (11 ऑक्टोबर 2024) : लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञाताने विवाहितेच्या घरात घुसून तिची निर्घृण हत्या केली. जळगाव शहरातील रणछोड नगर परिसरात ही घटना घडली. सुवर्णा राकेश नवाल (57) असं खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.

अशी घडली खुनाची घटना
शहरातील गणेशवाडी शेजारी असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागील रणछोड नगरात मनकमल बंगल्यात राहणार्‍या सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात शिरला. त्यावेळी त्याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.

दरम्यान रात्री 8.30 वाजता मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात केली. रात्री उशिरा महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये देण्यात आला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.. भर वस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !