आजीच्या दागिण्यांवर जळगावात नातवाने मारला डल्ला : गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
Grandson thrashed grandmother’s jewelery in Jalgaon : Crime branch slapped shackles जळगाव (14 ऑक्टोबर 2024) : आपल्या आजीच्याच घरात दागिण्यांची चोरी करणार्या नातवाला गुन्हे शाखेने अटक केली. योगेश संतोष पाटील (शिव कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे चोरी प्रकरण
शिवाजीनगर परिसरात गोदावरी पंडित पाटील (88) ही वृद्ध महिला वास्तव्यास आहे. 23 ऑगस्ट रोजी त्यांची मुलगी आणि नातू हे त्यांच्याकडे आले होते. घरात झोपलेले असतांना संशयित योगेश पाटील याने घरातील कपाटातून वृद्ध महिलेचे साडेतीन लाख रुपये किंमतीचे दागिने आणि 20 हजारांची रोकड असा एकूण तीन लाख 70 हजारांचा ऐवज चोरुन नेला.

याप्रकरणी शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वृद्ध महिलेच्या घरातून दागिने चोरीस गेल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीच्या पथकाकडून संशयिताचा शोध घेतला जात होता.
दागिणे विक्रीसाठी आल्यानंतर आरोपीला अटक
योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, संजय हिवरकर, हरीलाल पाटील, विजय पाटील, रवि नरवाडे, राजेश मेढे, प्रदीप सपकाळे यांनी सापळा रचून योगेश पाटीलला अटक केली व त्याच्याकडील तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपीला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
